उस्मानाबाद (सचिन बिद्री) : याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१० जुलै म्हणजेच हिंदू धर्मातील आषाढी एकादशी व मुस्लिम समाजातील बकरी ईद असे दोन मोठी सण असलेला अत्यंत महत्वाचा धार्मिक पवित्र दिवस.राज्यातील बर्याच जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी असल्याने बकरी ईद साजरा करण्याचे टाळले पण उस्मानाबाद(धाराशिव)जिल्ह्यातील उमरगा शहरात मात्र या पवित्र दिवशी बळीराजाचा दैवत,महाराष्ट्राची शान,शेतात काबाडकष्ट करणारा “खिल्लार” जातीचा पांढरा शुभ्र रुबाबदार बैल ‘बकरी ईद’ चे औचित्य साधून कुर्बानी च्या नावाखाली कापलेली घटना आढळून आली आहे.तर तिघांविरिद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि १० (सोमवार) रोजी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास सपोनि जाधवर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती भेटली की,शहरातील कोळीवाडा येथे जिंदालाल ईस्माईल शेख यांचे पत्रा शेडमध्ये बकरी ईद सणाच्या अनुषंगाने एक बैल कापत आहेत.यावर स.पो.नि. जाधवर, यांनी सदर मिळालेल्या बातमीबाबत
पोलीस निरीक्षक राठोड यांना माहीती दिली. पो.नि. राठोड यांनी सदर ठिकाणी पंचासह जावुन पुढील कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पोहेकॉ बोईने,सपोनि जाधवर,पोह कामतकर, घोळसगांव, मपोह राठोड, पोका उंबरे आदी शहरातील कोळीवाडा भागात जावुन पाहीले असता, सदर ठिकाण हे जिंदालाल ईस्माईल शेख यांचे छत
नसलेले पत्रा शेड आढळून आले तर आतमध्ये जावुन पाहणी केली असता अंगणातील फरशीवर तीन इसम हातात सुरी घेवुन एक पांढऱ्या रंगाचे ‘खिलार’ जातीचे अंदाजे रु३०,०००/- रूपये किंमतीचे बैल,(सरळ शिंगे व काळा गोंडाचे शेपुट व नाकात काळया दोरीचे वेसण असलेल्या) बैलाचे गळा व छाती पर्यंतचा शरीर कापुन बैलास जिवे ठार मारून बैलाचे अंगावरील
वरील कातडी सोलत असताना मिळुन आले. यामध्ये जिंदालाल ईस्माईल शेख,वय- ४४ वर्षे, रा. कोळीवाडा उमरगा,नजीर अब्दुलरशीद कुरेशी वय- ४४ वर्षे रा. गुंजोटी,आणि अयुब नजीर कुरेशी वय- २१ वर्षे रा. गुंजोटी असे तिघे इसम सदर निर्घृण कृत्य करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
यावेळी पोलीसांनी विचारणा केली असता,”बकरी ईद”सण असल्याने ‘कुर्बानी’ म्हणुन बैल कापत असल्याचे सांगीतले.
पंचासमक्ष सदर ठिकाणचा सविस्तर पंचनामा करून नमुद आरोपीतांकडुन बैल मारण्यासाठी वापरलेले हत्यारे सुरी एकुण ८ व २ लहान लोखंडी रॉड तसेच बैल बांधण्यासाठी वापरलेले २ रस्सी असे पंचासमक्ष जप्त केले आहे. त्यानंतर बैलाचे शवविच्छेदन होवुन अभिप्राय मिळणेबाबत व आवश्यक ते सी.ए. सॅम्पल सीलबंद करून पाठविण्यात आले आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात गोवंशीय जनावराचे हत्याबंदीचे नियम असताना देखील जिंदालाल ईस्माईल शेख
यांचे पत्रा शेडमध्ये बकरीईद सणासाठी कुर्बानी म्हणुन एक “खिलार” जातीचे बैल कापण्यात आल्यावरून,या प्रकरणी तिन्ही आरोपी विरूध्द कलम- 429,34 भा.दं.वि.सहकलम-5,5(ब), 9 महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम 1976 व सहकलम-4,25 शस्त्र अधिनियम 1959 अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात पो का बाबासाहेब बलभिम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *