उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगावच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्यअशा “वारकरी बाल दिंडीचे” आयोजन करण्यात आलेलं होतं. बालकांचा उत्साह आणि पालकांची साथ यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेलं या प्रसंगी दिसून आले.

या दिंडीत शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये,विठ्ठल -रुक्मिणीच्या वेशामध्ये नटून आलेले होते.तर विविध वेशभूषा मध्ये नटून,थटून,सजून आलेले लहान लहान मुलं आणि त्यांनी मृदंग-टाळ गजरांच्या वाद्यांमध्ये धरलेला फुगडीचा फेर यामुळे अक्षरशः पंढरी कोरेगावमध्ये अवतरल्यासारखी वाटत होती.

याप्रसंगी सरपंच संजय पाटील, उपसरपंच तथा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वजीत कटके, सोसायटीचे चेअरमन हनुमंत डावरगे जेष्ठ नागरिक भाऊराव पाटील भाऊराव मोरे,वामन खटके,दिगंबर खटके गणपत मोरे,मनोहर खटके,विष्णू पांगे नवनीता खटके,सविता खटके,चंदाबाई इंगळे आदी मान्यवर बाल वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाली होते. ही दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण स्वामी,लक्ष्मी वाघमारे, उमाचंद्र सूर्यवंशीअशोक बिराजदार तसेच अनेक पालकांनी परिश्रम घेतले व सहकार्य केले.

सचिन बिद्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *