उस्मानाबाद : उमरगा शहरातील आदर्श विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची वारकरी दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली,या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषेत,टाळ-मृदंगाच्या गजरात,अभंग व भजने गात शहरातून फेरी काढून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

प्राचार्य सोमशंकर महाजन व पर्यवेक्षक,पाटील बी.एम.यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या पुतळ्याभोवती रिंगण करून अंभग म्हणून या दिडींचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवराज औसेकर ,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग होता या दिंडीसाठी श्रीमती निर्मला चिकुंद्रे , तात्याराव फडताळे , राजेंद्र जाधव ,बेबीसरोजा स्वामी,सुवर्णा चौधरी,निलीमा कुलकर्णी,शिवराज सुरवसे,विकास कांबळे,दयानंद बिराजदार आदीनी परिश्रम घेतले.
(सचिन बिद्री)