पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमामध्ये ६० टक्केहून अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे तसेच, महामंडळाच्या अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर छायाचित्र लावून अर्ज करावा. अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. सोबत जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पुराव्याबाबतच्या स्वयंसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे पुणे