
पुणे सोलापूर महामार्ग भिगवण जवळ आज मालवाहतूक ट्रक व चार चाकी गाडी यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात एक जनाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला या अपघातामध्ये या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार चाकी कार मधील उमेश श्रीकृष्ण वैद्य वय 47 यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे अपघातानंतर मालवाहतूक ट्रकचालक पसर झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवासांनी मदतीसाठी धाव घेतली या घटनेबाबत भिगवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे