बारामती : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्याप्रचार रथाचा शुभारंभ उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
सिताफळ, बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन व कांदा या पिकांची विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. या पिकांचा विमा नजीकच्या महा ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र व राष्ट्रीयकृत बँकेत भरता येईल. शेतकऱ्यांनी फळपीक विमा प्रतिनिधी प्रतीक कदम (भ्रमणध्वनी क्रमांक ९८३४२१६८१८) व पीकविमा प्रतिनिधी पांडुरंग नलवडे (भ्रमण ध्वनीक्रमांक ८८३००३६४४३) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे