औरंगाबाद महानगरपालिका माजी सभापती रतनकुमार पंडागळे यांच्या कार्यकर्तृत्वार प्रकाश टाकणारा ग्रंथ भीम ऊर्जेतून पेटलेला निखारा’ या ग्रंथाचे प्रकाशन दि. २७ जुलै २०२२ रोजी दुपारी एक वाजता संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा, औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमा अगोदर १२ वाजता भीमशाहिरा सीमाताई पाटील आणि संगीतकार जॉली मोरे यांचा प्रभोधनात्मक तुफान शाहिरी जलसा आयोजित केला आहे.
रतनकुमार पंडागळे (माजी सभापती मनपा औरंगाबाद) यांचे जीवनचरित्र रेखाटलेला हा ग्रंथ दोन वर्षापासून प्रकाशनाच्या वाटेवर होता.परंतु कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांना जीव वाचवणे अत्यंत महत्वाचे झाले होते. ह्या जीवघेण्या आजाराने कुणालाच सोडलं नाही. सारं जनजीवन अस्तव्यस्त झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचे चटके आजही आम्ही सोसत आहोत. ‘भीम ऊर्जेतून पेटलेला निखारा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मार्च २०१९ मध्ये ठरला होता. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार होता. परंतु लगेंच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सोहळा पुढे ढकलावा लागला. आता हा सोहळा २७ जुलै रोजी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते हा पार पडणार आहे.
या ग्रंथामधे अनेक मान्यवर, साहित्यिक,प्राध्यापक, कार्यकर्ते, विचारवंताचे लेख आहेत. या ग्रंथाचे मुख्यसंपादक स. सो. खंडाळकर आहेंत. सुंदर मुखपृष्ठ, दर्जदार कागद, उत्कृष्ट अक्षर जुळवनी,अचूक शब्दाकंन आणि छपाईसाठी संपादक मंडळानी ह्या ग्रंथासाठी खुप मेहनत घेतली आहे. अत्यंत सुबक असा हा ग्रंथ ४०० पानाचा आहे.या ग्रंथाविषयी सर्वानाच प्रचंड आकर्षण आहे. रतनकुमार पंडागळे यांच्या एकूणच आंबेडकरी चळवळीतल्या कार्याचा लेखा जोखा या ग्रंथात रेखाटला गेला आहे. नवतरूण कार्यकर्त्यासाठी तो ऐतिहासिक दस्तऐवज असणार आहे. हा ग्रंथ मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. या ग्रंथाची प्रकाशन सोहळ्याची पूर्ण तयारी जोरात सुरु असून पाहुण्याच्या भेटीगाठी,कॉर्नर बैठका, प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हा सोहळा नेत्रदीप असाच ठरणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन रतनकुमार पंडागळे गौरव ग्रंथ समिती आणि संपादक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद