section and everything up until
* * @package Newsup */?> नळदुर्ग मध्ये प्रत्येक घरांवर फडकणार तिरंगा, हर घर तिरंगा उपक्रमाची जय्यत तयारी-मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार | Ntv News Marathi

प्रतिनिधी आयुब शेख

उस्मानाबाद : भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

ऐतिहासिक नळदुर्ग नगर परिषद च्या वतीने 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमानिमित्त शहरातील महिला बचत गटाच्या वस्ती स्तर संघ आणि शहर स्तर संघाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या शहरातील सर्व नागरिकांना व हर घर तिरंगा हा उपक्रम सर्वजण राबवावे असे आव्हान करण्यात आले ध्वजारोहण कशा पद्धतीने केलं पाहिजे याचाही देखील मार्गदर्शन करण्यात आला. प्लास्टिक मुक्त शहर कशा पद्धतीने करायचं परिसरात स्वच्छताबाबत जनजागृती करण्यात आली व त्याच पद्धतीने शहरांमध्ये समाज उपयोगी उपक्रम रांगोळी स्पर्धा तसेच अनेक उपक्रम राबविण्यात येतील असेही आवाहन करण्यात आले. मार्गदर्शन मा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड व स्वच्छता निरीक्षक मुनिर शेख यांनी देखील मार्गदर्शन केले. सदर उपक्रमासाठी न प चे लेखापाल गोविंद अंबर, विनीत चव्हाण, रानुबाई सपकाळ, सुशांत भालेराव, शाहीन पठाण तसेच वस्ती स्तर संघ व शहर स्तर संघाच्या अध्यक्ष, सचिव व कोशअध्यक्ष तसेच इतर सदस्य उपस्थित होते. शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त घरावर व खाजगी आस्थापनेवर तिरंगा झेंडा संहितेप्रमाणे फडकवावा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा असे आव्हान मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले आहे.
नळदुर्ग मध्ये प्रत्येक घरांवर फडकणार तिरंगा, हर घर तिरंगा उपक्रमाची जय्यत तयारी. करताना मुख्याधिकारी सर्व कर्मचारी दिसून येत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *