उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग-भुईकोट किल्ल्यातील नर- मादी धबधबा ओसंडून वाहत आहे. पाऊस नसल्याने हा धबधबा कोरडा पडला होता. आता झालेल्या पावसाने हा धबधबा सुरू झाला आहे. पर्यटकांची गर्दी होत आहे. नर-मादी धबधबा व नळदुर्ग किल्याची डोळ्याची पारणं फेडणारी काही दृश्य किल्ला भाडेतत्त्वावरवर चालवणाऱ्या युनिटी मल्टी कॉम्स या कंपनीने घेतली आहे
नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास..
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ 3 किलोमीटर लांब पसरलेली आहे. या तटबंदीत 114 बुरूज आहेत. किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने युनिटी मल्टी कॉम्स कंपनीने भाडेतत्वावर घेतल्यानंतर किल्ल्यामध्ये पूर्णतः शोभीकरण करण्यात आले आहे. आता नर-मादी धबधबा सुरु झाल्याने किल्ला अतिशय आकर्षक दिसत आहे.
उत्तरेच्या बाजूने वाहत येणारी बोरी नदी किल्ल्याचा आत येऊन तिला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळवली आहे. पूर्व-पश्चिम असा हा बंधारा अतिशय कल्पकतेने परंतु भक्कम अशा तर्हेने बांधलेला आहे. बंधार्याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडव्यांना नर व मादी अशी नावे देण्यात आली आहेत. यालाच नर-मादी धबधबा असे संबोधले जाते. पावसाळ्यात नदीला पाणी आले, की नर-मादी धबधबतील पाणी पुढे 100 फूट खाली खोल जाऊन आदळते. ते सुंदर व विहंगम दृश्य पाहताना अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिटले. या धबधब्याचे वैशिष्टय म्हणजे, अगदी जवळ जाऊन तेथून धबधबा पाहता यावा, म्हणून युनिटी मल्टी कॉम कंपनीने गॅलरीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. पर्यटकांसाठी गोल्फ कार सोय आहे. बोटिंगची सोय आहे. पर्यटकांसाठी अशा अनेक मूलभूत सुविधा किल्ल्यांमध्ये आहेत. युनिटी मल्टी कॉम कंपनीने संचालक कपिल मौलवी यांनी भुईकोट किल्ल्याचा आनंद घ्यावा असे आव्हान करण्यात आले.
प्रतिनिधी
(आयुब शेख )
9975177475