सचिन बिद्री:उमरगा
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो.कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ तर कधी वारे-वावदन व गारपीट अशी संकटं सतत थैमान घालत असतात. मागच्या दोन वर्षाचा पीक विमाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यासाठीची लढाई अजूनही न्यायालयात प्रलंबित आसून यंदा तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. घाम गाळून अन् रक्त आटवून केलेली पेरणी अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानीची पाहणी व पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत व दिलासा द्यावा याकरीता ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने उमरगा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.निवेदनावर फाऊंडेशनचे पदाधिकारी सत्यनारायण जाधव,ॲड. ख्वाजा शेख,ॲड.राजीव गणगे,वाघंबर सरवदे, करीम शेख,संतोष चव्हाण,अशोक सुरवसे, किरण कोकाटे,धनय्या स्वामी,दादा माने,बबिता मदने,प्रदिप चौधरी,राजू भालेराव, किशोर औरादे,राजू बटगिरे, बळीराम कांबळे,, संजय पतंगे,राजन पतंगे,प्रविण पतंगे, सुभाष दळगडे,मल्लु दळगडे,सुरज अबाचने,तुकाराम शिंदे,ज्ञानेश्वर जाधव,यादव कांबळे,गणेश ब्याळे यांसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.