सचिन बिद्री,उमरगा:

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट पासून जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्यापैकी आज उमरगा शहरातून तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील जि.प हायस्कूल व तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित या तिरंगा प्रभात फेरीमध्ये उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, तहसीलदार राहुल पाटील,न.प.चे प्रशासक रामकृष्ण जाधवर, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार,प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
तहसील कार्यालयापासून निघालेल्या प्रभातफेरीत “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर दि १३ ते १५ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकवला जाणार आहे.या उपक्रमांची माहिती शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेस होण्यासाठी या प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते.तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता, बंधुता, सार्वभौमत्व व राष्ट्रहित राष्ट्रप्रेम बाबत जनजागृती निर्माण होण्याहेतु, शाळेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन दरम्यान च्या काळात जि प शाळेत घेण्यात येणार असल्याबाबत मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक बाबासाहेब जाधव,बशीर शेख, चंद्रशेखर पाटील, बलभीम चव्हाण, सदानंद कुंभार, संजय रुपाजी, सरिता उपासे, सोनाली मुसळे, ममता गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.प्रभातफेरीत गाईडच्या मुलींचे संचलन सर्वाचे लक्ष वेधून घेत होते तर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने या तिरंगा प्रभात फेरीत सहभागी झाल्याचे निदर्शनास आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *