section and everything up until
* * @package Newsup */?> पुणे : पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत शेतक-यांना बांधावर मार्गदर्शन | Ntv News Marathi


पुणे : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वडकी ता.हवेली येथे तालुका कृषी अधिकारी मारूती साळे, यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग यांच्या वतीने मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण व उपाययोजना बाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या हस्ते बाजरी प्रकल्पातील पिक संरक्षण निविष्ठा व भाजीपाला मिनीकिट वाटप करण्यात आले.

हडपसर – १ येथील कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळूंजकर यांनी ही माहिती दिली.हडपसर -१ कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळूंजकर यांनी मका व सीताफळ पिकावरील किडींची व रोगांची ओळख करून दिली. तसेच एकात्मिक पद्धतीने किडरोग नियंत्रण व उपाययोजना करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतक-यांना केले .कृषी सहाय्यक श्रीमती पुष्पा जाधव व श्रीमती ज्योती हिरवे यांनी कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेटीचे उत्कृष्ट नियोजन केले.क्षेत्रीय भेटीच्या वेळी बाळासाहेब आंबेकर, अर्जून आंबेकर, मनोहर शेवाळे तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *