पुणे : सध्या राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावलेली असल्याने अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले पाहावयास मिळत आहे. या होणाऱ्या पावसामुळे सर्वत्र काही प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळे त्या त्या लाभ क्षेत्रातील धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे तस पहाता सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. पण याच जिल्ह्यात असणार्‍या उजनी धरणाने सोलापुर जिल्ह्याच्या वैभवात मोठी भर पडलेली आहे जरी या जिल्ह्यात कमी पाऊस पडत असला तरी पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी या धरणात येत असल्याने धरणाचा पाणी साठा वाढण्यात मोठी मदत होत आहे त्यामुळे या उजनी धरणाच्या पाण्या मुळे शेजारील अनेक जिल्ह्यांची पाण्याची गरज पूर्ण होत असून सर्व परीसरातील पिण्याच्या पाण्या सह शेती आवर्तनाची तहान भागते. आहे कारण उजनी धरणाला चार जिल्ह्यांचे ‘वरदायिनी’ समजले जाते

सोलापूर जिल्ह्यासह इंदापूर, कर्जत,करमाळा येथील शेती व पाणीपुरवठा योजना तसेच औद्योगिक वसाहती यांचे सर्वस्वी भवितव्य याच उजनी धरणावर अवलंबून आहे, तर विशेष बाब म्हणजे या धरणात पाणी हे पुणे शहर ,मुळा -मुठा,इंद्रायणी या नद्यांमधून येते. आणी आत्ता सद्दा या नदी लाभ क्षेत्रात समाधान कारक पाऊस होत असल्याने उजनी धरणातील पाण्याची पातळीत कमालीची वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या बाबतआज सकाळी सहा वाजता उजनी धरण व्यवस्थापन कार्यालय उजनी विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उजनी धरण हे 84.33 टक्के एवढ्या क्षमतेन भरले असून त्या पैकी

1) बाष्पीभवन (mm/Mcum) -4.00/ 0.88 एवढे पाणी कमी होते असल्याचे सांगण्यात आलय तर
2) सीना मधा LIS – 259 क्युसेक.
3) दहिगाव एलआयएस – 43 क्युसेक.
4) बोगदा – 200 क्युसेक.
5) मुख्य कालवा -1000 क्युसेक.
6) पॉवर हाऊस – 1000 क्युसेक.
7) नदी स्लुइस — 1000 क्युसेक,
पाणी सोडले जात असल्याचे दिलेल्या अधिकृत माहीतीत नमुद करण्यात आले आहे

एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर ,पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *