पुणे : इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर गावात एक कोटी 18 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन कार्यक्रम आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील कोणत्याही विकास कामासाठी लागणाऱ्या निधीची कोणत्याही प्रकारची कमतरता असल्याचे जाणीव होऊन दिलेली नाही, त्यामुळे आता जरी आपले सरकार नसले तरी पिटकेश्वर किंवा दुसरे कोणत्याही गावाच्या विकास कामा मध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडून देणार नाही असे वक्तव्य मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर सभेत केलेले आहे.इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर येथे पाणीपुरवठा योजनेच्या भूमी पूजन समारंभा वेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे