राज्यपाल, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ठाणे येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अधिवेशनात होणार सन्मान
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन पाली या ठिकाणी देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्त हे विशेष अधिवेशन दिनांक ८ऑगस्टला होत असून यामध्ये हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योजक तथा भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्हा सरचिटणीस मिलिंदभाऊ यंबल यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मिलिंदभाऊ यंबल यांचा उद्या दिनांक 8 रोजी ठाणे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देत यंबल यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख गोपालराव सरनायक यांनी दिली आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच राजकीय सामाजिक कार्य केल्याबद्दल मुंबई ठाणे येथे मिलिंदभाऊ यंबल यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी अनेक गोरगरिबांना कोरोनाच्या काळामध्ये मदत केली आहे. त्यांच्याच कार्याचा गौरव म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबाबत मराठवाडा स्तरातून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
उदया दि.८ रोज रविवार रोजी ठाणे येथील पत्रकाराचे खूले एकदिवसीय अधिवेशन होणारं असुन याचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.संजय केळेकर, आ. जितेन्द्र आव्हाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार निरंजन डावखरे, अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सूने, युसूफ खान केंद्रीय कार्याध्यक्ष, सुरेश सावळे केंद्रीय महासचिव, अशोक पवार केंद्रीय सचिव, राजेंद्र भुरे केंद्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशधयक्ष कैलासबापू देशमुख, संपर्कप्रमुख बाळासाहेब सोरर्गीकर,यांची उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख गोपालराव सरनायक, विकास दळवी हिंगोली जिल्हाअध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष उमेश चक्कर पाटील गजानन देशमुख, प्रल्हाद चव्हाण यांनी केले आहे.