हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईत बैठकीचे आयोजन.
हिंगोली : कट्टर शिवसैनिक कळमनुरी शिवसेनेचे आमदार जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे शिंदे गटात शामिल झाल्याने हिंगोलीत शिवसेनेला मोठा धक्का मानला जात होता परंतु बंडखोर आमदार संतोष बांगर यांना हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मन वळवण्यात अपयश आले.


जिल्ह्यातील सहापैकी पाच तालुकाप्रमुख यासह सर्व उपजिल्हाप्रमुखासह जिल्हा परीषदेचे माजी सदस्य माजी नगरसेवक,याच्यासह हिंगोली, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश उर्फ भैया पाटील गोरेगांवकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याची माहिती मिळाली असुन हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांची मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे


हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार आहेत तसेच माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगांवकर यांचे चिरंजीव हिंगोली परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैया पाटील यांना हिंगोली जिल्ह्यात माननारा शिवसेनेचा मोठा गट असुन हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याने हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात असुन मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत पार पडणाऱ्या बैठकीत हिंगोलीचा जिल्हाप्रमुख कोन होणार यावर चर्चा होणार का?, जिल्हाप्रमुख कोन हे पुढे निश्चित होणार या कडे सर्व जिल्हाच लक्ष लागलं आहे.