हिंगोली : एसआयटी पथकातील पोलीसांनी नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी खुन प्रकरणात विशेष तपास केल्याने एसआयटी पथकातील आधिकाऱ्यांचा प्रशिस्त पत्र देऊन गौरव करण्यात आला.
नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांचा भर दिवसा खुन झाल्याची घटना नांदेड येथे घडली होते यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने खुनाचे प्रकरणं संपूर्ण राज्यात गाजले होते.यामुळे पोलीसांवर मोठा दबाव होता उद्योजक संजय बियाणी यांच्या खुनाचा तपासात विशेष तपास पथकातील एसआयटी पथकाने तपासचक्र फिरवत पंचावन दिवसांत बियाणी यांच्या खुनातील आरोपींना आटक केले होते एसआयटी पथकातील पोलीस कर्मचारी यांचा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कुमार कबाडे,मोरे, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पत्र देत गौरविण्यात आले असुन हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी विशेष कामगिरी बजावत हिंगोली जिल्ह्यातील मोठमोठे गुन्हे उघडकीस आनुन गुन्हेगारांचा प्रर्दाफाश केला होता आणि त्यांनी आत्ता नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांच्या खुनात विशेष कामगिरी केल्याबद्दल शिवसांब घेवारे यांना प्रशिस्त पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.