
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गावागावात सर्रास खुलेआम पणे सुरू असलेली अवैध धंदे हे मागील आठ महिन्यांपासून बोकाळले असुन यांमध्ये अवैध दारु विक्री, गौण खनिज चोरी,मटका,जुगार,आॅनलाईन मटका, अवैध गुटखा विक्री सुरू असुन अवैध धंदे सुरू असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून याकडे गोरेगाव पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चालले आहे वरीष्ठानी गोपनीय माहिती आधारे धाडसत्र टाकत कारवाया कराव्या आणि सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करावे यासाठी गोरेगाव येथील गोपाल गोविंदराव उचाडे यां युवकांने पुढाकार घेत दि. 1 जुन रोजी मा.विशेस पोलीस महानिरीक्षक नांदेड यांना निवेदन देत गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे बंद करा या मागणीचे निवेदन दिले असुन निवेदनावर गोपाल उचाडे यांची स्वाक्षरी आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देणार का अशी मागणी होत आहे.