थंडगार स्वच्छ पाणी पिऊन प्रवाशांचे होते समाधान.

उन्हाळा सुरू झाला कि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने अनेक गावागावात नागरीकांना दुरवरुन पिण्यासाठी पाणी आणावे लागते उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर गेल्याने बोअरवेल,हापसी,विहीरीत कोरडेठाक पडत असुन पाण्याची टंचाई पाहता अनेकजण आपल्या घरा समोर, बसस्थानक परिसरात, रस्त्यावरील कडेला पाणपोई लावुन मातिच्या माठात पाणी भरून नागरीकाची तहान भागवितात परंतु सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी बंडु उर्फ मारोती कुंडलीक रवने हे मागील पाच वर्षांपासून आपल्या घरा समोर बसस्थानक परिसरात “तृष्णातृप्ती पाणपोई”लावुन प्रवाशी तसेच ईतर नागरीकांची तहान भागवित आहे विशेष म्हणजे बंडु उर्फ मारोती रवने हे पाणपोई मध्ये शुद्ध आणी थंडगार पाण्याच्या विस लिटरच्या बाटल्या मधुन प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय करतात दिवसाकाठी या पाणपोईत शंभर ते सव्वाशे
बाटल्या पाणी पिण्यासाठी लागतात साधारणपणे थंडगार शुद्ध पाण्याची एक विस लिटर बाटली विस रुपयाला मिळत असुन बंडु उर्फ मारोती रवने हे उन्हाळ्यात दररोज दोन ते आडीच हजार रुपयांचे पाणी विकत घेत प्रवाशी तसेत ये जा करणाऱ्या नागरीकांना तहान भागवित आहे

तसेच पाणपोई मध्ये झाडे लावा झाडे जगवा,पाणी आडवा पाणी जीरवा,बेटी बचाओ बेटी पढाओ,जल है तो कल है,असे बॅनर लावून जनजागृती पण केली जाते बंडु उर्फ मारोती रवने यांनी गोरेगाव बसथांबा परीसरात सुरू केलेल्या तृष्णातृप्ती पाणपोई मुळे हजारो नागरीकांची तहान भागवली जात आहे त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.