अँट्रोसिटी कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून दिल्या बद्दल ॲड.अखिल अहेमद यांचा विराट राष्ट्रीय लोकमंच काॅन्सीलच्या वतीने केला सत्कार करण्यात आला .

हिंगोली येथील सामाजीक क्षेत्रात कार्यरत असलेली विराट राष्ट्रीय लोकमंच कॉन्सिल चे संचालक शेख नोमान शेख नईम व इतरांविरुध्द पोलिस स्टेशन हिंगोली येथे कलम ३ ( १ ) ( आर ) , ३ ( १ ) ( एस ) अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १ ९ ८ ९ व भा.द.वि. च्या विविध कलमांतर्गत हिंगोली शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर प्रकरणात जुबेर खान जाफर खान यांना अटक ही करण्यात आली होती व शेख नौमान शेख नईम व शेख नफिस शेख लाल या दोघांनी जिल्हा सत्र न्यायालय हिंगोली येथे ॲड.अखिल अहेमद यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळणे बाबत अर्ज सादर केला होता दोन्ही पक्षांचे म्हणने एकुण घेतल्यानंतर न्यायालयात अँड .अखिल अहेमद यांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे ग्राह्य धरुन मा . न्यायालयाने अटक आरोपी जुबेर खान यास अंतीम जामीन मंजुर केले व प्र विराट राष्ट्रीय लोकमंच चे संचालक शेख नौमान शेख नईम प्र व शेख नफिस शेख लाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर केले . सदर प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अँड , अखिल अहेमद यांनी युक्तिवाद केला व त्यांच्या युक्तिवादास ग्राह्य धरुन प्रभारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश वसमत देशमुख यांनी अर्जदारांचा अटकपूर्व जामीण मिळणे बाबतचा अर्ज मंजुर करुन अर्जदारांचे जामीनावर सुटका केली . या प्रकरणी ॲड अखिल अहेमद यांना ॲड. लतीफ पठाण, ॲड. आसिफ शेख , ॲड. सय्यद शोएब यांनी सहकार्य केले .या वेळी विराट राष्ट्रीय . लोकमंच काॅन्सीलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल , राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद प्रदेश सचिव, ॲड.सय्यद मुस्तफा , जिल्हाध्यक्ष तौफिक अहमद खान , जिल्हा प्रमुख महासचिव शेख बासित , तालुका अध्यक्ष शेख अवेज , आमेर अली बागवान , शेख अदनान पहेलवान , जुबेर खान , शेख मुखतार यांनी ॲड. अखिल अहेमद व त्यांचे सहकारी यांची सदीच्छा भेट घेत विराट राष्ट्रीय लोकमंच कॉन्सिलच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.