बचवपक्षाचे अँड अमोल गुंड यांचा युक्तिवाद ग्राह्य

उस्मानाबाद : तुळजापूर हुन सोलापुर कडे जाणारी बस क्र. Mh12 Bl- 2635 ला माळुम्ब्रा येथे अडवुन बस चालकास शिवीगाळ व मारहाण केली म्हणुन पांगरदरवाडी येथील आरोपी रवी गहीनीनाथ शिंदे याच्यावर तामलवाडी पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम 353, 323,504,506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर खटला क्र.१४३/२०१७ उस्मानाबाद येथील अतीरिक्त सत्र न्यायधीश पी. एच.कर्वे यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. सदर प्रकरणात आरोपीला खोट्या गुन्ह्यांत गुंतवले असुन आरोपीची ओळख सिद्ध होत नाही तसेच आरोपीला शिक्षा देण्याईतपत ठोस पुरावा सरकार पक्षाकडे नाही असा बचाव आरोपीचे वकील ॲड. अमोल गुंड यांनी केला होता. बचावपक्षातर्फे केलेला बचाव व युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे ॲड.अमोल हनुमंतराव गुंड यांनी काम पाहीले. त्यांना ॲड. सतीश येडके ,ॲड. किरण चादरे ॲड.महेश चव्हान यांनी सहकार्य केले.

प्रतिनिधी आयुब शेख तुळजापूर उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *