उमानूर, रेगुलवाही आणि मरपल्ली ग्रा.पं. मध्ये कोट्यवधींचा निधी

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम उमानूर,मरपल्ली आणि रेगुलवाही या तीन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गावात माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते नुकतेच कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

जनसुविधा जिल्हा वार्षिक योजना 2021-22 अंतर्गत अहेरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने उमानूर, रेगुलवाही आणि मरपल्ली या तीन ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या विविध गांवात माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार, उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावडे,रेगुलवाहीचे सरपंच ममिता नैताम,मरपल्लीचे सरपंच अरुण वेलादी तसेच उमानूर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उमानूर परिसरात पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन झाल्याने आता या परिसरात नागरिकांचे अनेक समस्या मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी ताईंनी परिसरातील नागरिकांशी आस्थेने संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

गावात जाण्यासाठी ऑटोरिक्षाचा घ्यावा लागला आधार

जोगनगुडा ते तिमरम रस्त्यावर नुकतेच मागील वर्षी बुडीत पुलाचे बांधकाम करण्यात आले.मात्र,यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर नाल्यावरील पुलाचे दोन्ही बाजू खचून गेल्याने येथील नागरिकांना ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे.परिसरात बससेवा नसल्याने या पतीसारतील नागरिकांना स्वतःच्या दुचाकीने किंव्हा ऑटो रिक्षा घेऊन उमानूर पर्यंत ये-जा करावे लागत आहे.कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम जोगनगुडा येथे विकास कामांच्या भूमिपूजन साठी गेले असता त्यांनाही या अडचणींना सामोरे जावे लागले.पर्यायी पुलाच्या अलीकडे आपले वाहन ठेवून काही अंतर पायी प्रवास करून ऑटोरिक्षा आणि प्रवास करावा लागला.त्वरित संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून सदर पुलावरील खड्डे बुजविण्याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *