सांगली :- राहुल वाडकर
स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व मुक्ता फाैंडेशन, कोल्हापूर यांनी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोल्हापूर या कार्यक्रमा मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक दिग्गजांना त्यांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्काराचा वितरण या दोन संस्थांच्या वतीने केले , सदरच्या या कार्यक्रमात आष्टा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक पी एल घस्ते नाना यांना या संस्थेच्या वतीने आदर्श समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. सदरचा पुरस्कार तर त्यांच्या पत्नी सौ. सारिका प्रकाश घस्ते यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक अमोल महापुरे तर प्रास्ताविक विजय दणाणे यांनी केले. सदरचा उपक्रम दि. 9 रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच सत्यशोधक साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच मुक्ता फाैंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे आयोजन केले होते.
सदरच्या कार्यक्रमास डॉ. प्रा.सोमनाथ कदम सर त्याचबरोबर शितलकुमार डोईजड(सहाय्यक पोलीस निरीक्षक ) मा. अनिल म्हमाने सर मा. जयवंत उगले (गटविकास अधिकारी) मा. महेश चौगुले मुक्ता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.अमोल महापुरे सर, स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय दणाणे, राज्य सचिव अमर गंगथडे, राज्य उपाध्यक्ष नेताजी मस्के, राज्य कार्याध्यक्ष महेश शेळके, राज्य संपर्कप्रमुख बाबासो जाधव, राज्य निरीक्षक जमीर नायकवडी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रियाज मुल्ला स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य महिला आघाडी राज्याध्यक्षा सौ. कविता कांबळे, मा.राज्याध्यक्षा रेश्मा नायकवडी, राज्य उपाध्यक्षा मयुरी मेश्राम, राज्यसचिव कविता घस्ते, राज्य कार्याध्यक्षा निशा वळवडे, राज्य संपर्कप्रमुख वैशाली जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्षा यास्मिन मुल्ला सौ. आशा दणाणे, सौ. अंजली गंगथडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सूत्रसंचालन सौ. रुकसार बारगीर व रामचंद्र गलांडे यांनी केले तर मा.अमर गंगथडे यांनी आभार व्यक्त केले.