अन्यथा पंचायत समिती कार्यलाय समोर आंदोलन : चंद्रशेखर पूलगम
गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम होऊनही शासनाकडून नियमित पणे टप्याटप्याने वेळेवर पैसे निघत नसल्यने लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गरीब लाभार्थ्यांना विनाकारण पंचायत समिती कार्यालय भोवती चकरा मारावा लागत आहे.
शासनाचा या हलगर्जी पणामुळे तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीयांना विकासापासून वंचित राहाव लागत आहे. सिरोंचा तालुक्यातील ज्या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम पूर्ण केले. किंवा हफत्यानुसार कामाचे गती पाहून त्या लाभार्थ्यांची हफता देण्याची कृती करावी. अन्यथा सात दिवसाचा आत तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना हफ्ता (बिल) ना दिल्यास पंचायत समिती सिरोंचा कार्यालया समोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर पुलगम यांनी सिरोंचा येतील पंचायत समिती कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी विकास घोडे यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे