एसडिपीओ यशवंत केडगे व ठाणेदार सुनिल हूड यांचा कायदा व सुव्यवस्थेसाठी पुढाकार
वाशिम:-आगामी काळात श्री.गणेशाची स्थापना होणार असुन श्री चे यथोचीत स्वरुपात विसर्जन होणार आहे.हा विसर्जन सोहळा शांततामय वातावरणात पार पाडावा यासाठी मंगरुळपीर ऊपविभागिय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणी ऊपस्थीतीत ठाणेदार श्री.सुनिल हुड यांचेसह सर्व सबंधित विभागांच्या प्रमुखांनी विसर्जन मार्गाची सुरक्षाविषयक पाहणी करुन आढावा घेतला व आवश्यक त्या सुचना दिल्या.
मंगरुळपीर शहरात सर्वधर्मीय लोक आनंदाने सर्वधर्मीय विविध सण ऊत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.आगामी काळात गणेश ऊत्सव आहे.या ऊत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ऊपविभागीय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात आणी ठाणेदार श्री.सुनिल हुड यांच्या नेतृत्वात पोलिस यंञणा सज्ज झाली आहे.विसर्जन सोहळा शांततामय आणी आनंदाने पार पाडावा,विसर्जन मार्गात कुठलाही अडथळा येवु नये यासाठी दि.२३ आॅगष्ट रोजी पोलीस प्रशासनाने सर्व सबंधित यंञणांना सोबत घेवुन विसर्जन मार्गाची पाहणी करत सुरक्षाविषयक आढावा घेतला.विसर्जन मार्गात येणारे अडथळे याविषयी आढावा घेवुन विजेचे तार,केबल,मार्गातील अतिक्रमन आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स,पोलीस बंदोबस्त अशा गोष्टीविषयी आवश्यक त्या सुचना देवून पाहणी केली.हिंदुमूस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून मंगरुळपीर शहराचा नावलौकीक आहे.हा लौकीक अबाधित राहावा आणी सर्वधर्मीय बांधव गुण्यागोविंदाने सर्व सणऊत्सव आनंदाने साजरे करावेत यासाठी पोलिस विभागाकडून विविध प्रेरणादायी आणी समाजपयोगी ऊपक्रमही राबवणार आहेत.नेहमी सलोखा कायम राहावा यासाठी पोलीस विभागाची महत्वाची भुमिका आहे.दि.२४ आॅगष्ट रोजी पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत शांतता समितीची सभाही आयोजीत केलेली आहे.शहरात कुठलीही अनुचीत घटना,प्रकार निदर्शनात आल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क करावे असे आवाहनही यावेळी पोलीसांनी केले आहे.चांगल्या कामासाठी लोकांच्या पाठीशी पोलीस विभाग सदैव पाठीशी असुन कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्यांची कुठलीही गय केली जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे.या विसर्जन मार्ग पाहणी व आढाव्याच्या वेळी एसडिपिओ केडगे साहेब,ठाणेदार हुड साहेब,ना.तहसिलदार जवादे साहेब,महावितरणचे साबळे,न.प.चे राजेश संगत,निलेश भोयर,पोलिस विभागाचे रविंद्र कातखेडे,सुमित चव्हाण,महल्ले,पञकार,मंडळांचे पदाधिकारी आदींची ऊपस्थीती होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206