उस्मानाबाद : ढोकी पोलीस ठाण्याचे पथक पो.ठा. हद्दीतील अवैध मद्य विरोधी कारवाई कामी दि. 26 ऑगस्ट रोजी गस्तीस होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने उस्मानाबाद तालुक्यातील पारधी पिढी, बुक्कनवाडी येथे 11.15 वा. सु. गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे ग्रामस्थ- 1) बप्पा काळे 2) शंकर पवार 3) सुनंदा काळे हे तीघे गावठी दारु निर्मीती करताना आढळले. घटनास्थळी गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 1,200 लिटर आंबवलेला द्रव हा लोखंडी- प्लास्टीक अशा 6 पिंपांत असा एकुण अंदाजे 72,000 ₹ किंमतीचा माल आढळला. गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (फ) अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

  सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन ढोकी पो.ठा. चे सपोनि- श्री. जगदिश राऊत, पोउपनि- श्री. बुध्देवार,  श्री. गाडे, सपोफौ- सातपुते, पोहेकॉ- भंडारकवठे, पोना- क्षिरसागर, गुंड, खोकले, पोकॉ- जमादार, शिराळकर, मोरे, स्वामी यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *