उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील समाज विकास संस्थेच्या वतीने नाईचाकुर या पुनर्वसित गावामध्ये दहा हजार झाडे लावण्याचा उपक्रम दि 21 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष सतीश पवार यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सरपंच चंदुआप्पा स्वामी, उपसरपंच बी.के पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप बप्पा पवार ,सामाजिक कार्यकर्ते वेंकट लादे, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी समाज विकास संस्थेचे सचिव भूमिपुत्र वाघ त्यांनी आपले विचार व्यक्त करत असताना म्हणाले की, “ही योजना खूप महत्त्वाची आहे. चिरकाल अबाधित टिकणारी व्यवस्था आहे.आपण सर्वांनी ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक गावातल्या लोकांनी जर या झाडाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं. काळजी घेतली तर भविष्यामध्ये गावाला ऑक्सिजन कमी पडणार नाही.मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन निर्माण होईल” कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायत सदस्य मित्र गण वृक्षप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेंकट लादे यांनी केले तर आभार सरपंच स्वामी यांनी मानले.
