निमलगुडम व राजाराम येथे कार्यक्रम
गडचिरोल्ली : गुड्डीगुडम वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर च्या संलग्नित महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ राजाराम व निमलगुडम येथे लोहार समाजाचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा प्रकट दिन साजरा करण्यात आले.
कार्यक्रमात भगवान विश्वकर्मा यांचे प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून विधिवत पूजन तालुका शाखा अहेरी चे सदस्य माधव बामनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राजाराम शाखेचे अध्यक्ष रमेश बामनकर यांनी आपल्या मार्गदर्शनात लोहार समाजाचे दशा व दिशा, संघटन, एकत्रिकरण, सामाजिक कार्यक्रमाचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले. युवाअध्यक्ष आशिष चंदनखेडे, माहीला अध्यक्ष रेणुका बामणकर, सचिव दिलीप मेश्राम यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन बामनकर तर संचालन विश्वास मेश्राम, आभारप्रदर्शन पूजा बामनकर यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करिता प्रशांत बामनकर, कवेश्वर बामनकर, सरिता बामनकर, गोपाल चंदनखेडे, साईबाबा बामनकर, देवाजी बामनकर, वसंत बामनकर, रामदास आउतकर, जनाबाई बामनकर, अशोक बामनकर, सुनील बामनकर, विठ्ठल बामनकर आदिनी केले या वेळी समाजातील महिला पुरुष उपास्थित होते.