पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांचे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांसाठी जम्बो आमरण उपोषण आज दि. २१ रोजी सुरू करण्यात येणार आहे.
पाचोरा तालुक्यातील नेरी ते सार्वे, पिंप्री, भामरे, खाजोळा कडे जोडणारा रस्त्यावर गडद नदीवर तात्काळ फरशी व्हावी त्यामुळे दोनशे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल. शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी दहा फुट पाण्यातुन जावे लागते यामुळे दोन शेतकर्यांना आपला जीव गमवावा लागला गेल्या आठवडय़ात स्व धर्मा रामोशी या शेतकर्यांच्या डोक्यावर युरीया खताची गोणी असतांना त्याला पाण्यात जीव गमवावा लागला. काही राजकीय सत्ताधारी यांनी निवडणूक पुर्वी खोटे फरशीचे उद्घाटन करुन या शेतकऱ्यांना फसविले होते.
या विविध मागण्यांसाठी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज सुमारे शंभर शेतकरी आमरण उपोषणाला तहसीलदार कचेरी समोर आज दि. २१ रोजी सकाळी अकरा वाजता बसणार आहे. या बाबत आधीच निवेदन प्रशासनाला दिले असून याची दखल घेतली गेली नाही. यात गडद नदीवर तात्काळ फरशी व्हावी, स्व. धर्मा रामोशी या शेतकर्याला तात्काळ शासकीय मदत केली गेली पाहिजे. अशा मागण्या करण्यात येणार आहे. पाचोर्यात पहील्यांनादाच जम्बो आमरण उपोषण होणार आहे.