नागरिकांच्या नशिबी हेलपाटे तर शासकीय यंञणेत सावळा गोंधळ
दाखल्यांचा सावळा गोंधळ थांबणार कधी?–आदिवासी जनतेचा सवाल.
पालघर : गेल्या दिड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले होते.त्यामुळे ग्रामीण भागात बहुतेक शासकीय यंञणेची कामे थंडावली होती.त्यात शाळा,महाविद्यालये ,काँलेज बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ताटातुट झाली.काही शाळांचे आँनलाईन शिक्षण अभ्यासक्रम सुरु होते मात्र ग्रामीण भागात इंटरनेट अभावामुळे शिक्षणात साडेसाती पाहावयास मिळाली.हिच गत शासकीय कार्यालयांत हि अनुभवायला मिळत आहे.
आज बहुतेक सरकारी दाखले हे आँनलाईन पध्दतीने काढुन मिळत असल्याने ते मिळविण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे.नुकत्याच पालघर जिल्ह्यातील काही निवासी आश्रम शाळेचे ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी पालकांची धावपळ सुरु झाली आहे.परंतु आँनलाईन सुविधेच्या बोजवारामुळे पालकांना काम धंदा बुडवून हेलपाटे मारावे लागत आहेत.आँनलाईन दाखले मिळण्यासाठी आदिवासी बांधवांना सेतू कार्यालयाचा आधार असला तरी शासकीय यंञणेच्या भोंगळ कारभाराने दाखले वेळेत मिळण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे आँनलाईन सुविधा शाप कि वरदान अशी म्हणण्याची वेळ आदिवासी बांधवांवर ओढवली आहे.
जव्हार तालुक्यात हि अशाच एक प्रकार उजेडात आला आहे.जातीचे दाखले, नाँनक्रिमिनियर दाखला काढण्यास जव्हार प्रांत अधिकाऱ्यांची सही,बायोमेट्रिक थम्स दाखल्यावर आवश्यक असते.माञ मंञालयाकडून अद्याप प्रांत अधिकाऱ्यांचा बायोमेट्रिक थम्स व सही दोन महिन्यांपासुन अपडेट झाली नसल्याने दाखले मिळण्यास विलंब होत आहे.अशी बतावणी दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना संबंधित शासकिय अधिकारी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार जव्हार शहरात उजेडात आला आहे.शासनाने आँनलाईन सुविधा राबविली खरी परंतु शासकिय यंञणेतील सावळ गोंधळ सर्वसामान्य जनतेला शासकिय दाखले काढण्यासाठी ञासदायक ठरत आहे.ग्रामीण भागातील जनता कासोदुर पायपीट करुन दाखले घेण्यासाठी जव्हारला येते.परंतु दाखले वेळेत न मिळाल्यांने त्यांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसत आहे.शासकिय यंञणेतील आँनलाईन दाखल्यांचा ससेमिरा, सावळगोंधळ थांबवावा.अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860/मो.9404346064.