section and everything up until
* * @package Newsup */?> पालघर : जव्हारच्या काळशेती नदीचा पूल खचला,वाहतूक धोकादायक | Ntv News Marathi


लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष.

भरत गवारी जव्हार प्रतिनिधी

पालघर : जव्हार पासुन अवघ्या १८कि.मीटर अंतरावर असलेल्या न्याहाळे नांदगाव रस्त्यावरील काळशेती नदीचा पूल मुसळधार पावसाने खचला.पुलाच्या एका बाजूची संरक्षक भिंत अर्धी पडली असुन उरलेली भिंत पडण्याच्या बेतात असुन अखेरची घटका मोजत आहे.हा पूल कासा सुर्यनगर लघुपाटबंधारे विभागाच्या कार्य कक्षेत येतो. ह्या पूलावरुन ग्रामस्थांना वाहतुकीसाठी जीवघेणी कसरत करावी लागते आहे.येथील ग्रामस्थांनी पुलाच्या दुरुस्तीची मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे वारंवार करुन सुध्दा अद्यापही  कोणतेही अधिकारी पाहणीसाठी फिरकले नसल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.  
   न्याहाळे नांदगाव रस्त्याने  टोकरखांडला जाताना हा पूल लागतो.ह्या पूलाचे बांधकाम सन- १९७२ साली झाले आहे.त्यांनतर काही वर्षांनी मध्यंतरी पुन्हा या पुलाची डागडुजी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली होती.सन-२०१८ साली पुलाच्या संरक्षक भिंतीच्या  दुरुस्तीचे काम झाले होते.तिच पूलाची भिंत ३ वर्षानंतर म्हणजेच आता मागे पडलेल्या मुसळधार पावसाने पडली आहे.हा पूल साधारणतः २० फूट उंच आहे.परंतु यंदा पहिल्यांदाच पुलावरुन पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती.त्यात पूलाची भिंत खचली आहे. यामुळे येथील नागरिकांचे वाहतुकीचे मोठे हाल होत आहेत.काळशेती धरणाचा पाण्याचा थिरावा पुलाच्या ५०० मीटर परिसरात पसरला आहे.    काळशेतीचा पूल तुटल्याने कौलाळे,नांदगाव,भुरीटेक,कुर्लोद ह्या ४ ग्रामपंचायतींचा वाहतुकीला संपर्क तुटला आहे.त्यामुळे ह्या पूलाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
 " काळशेती नदीचा पूल तुटल्याने पुलावरुन तेथील ग्रामस्थांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे पूलाची तात्काळ दुरुस्ती करावी."-चंद्रकांत रंधा,उपसभापती जव्हार पंचायत समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *