सांगली : आष्टा येथे उद्या रविवार दि 25 रोजी नरवीर उमाजी नाईक यांच्या जंयती निमित्त येथिल नाईक ग्रुप च्या वतिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे .
नरवीर उमाजी नाईक यांच्या २३१व्या जयंती निमित्त रविवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित येथिल उमाजी नाईक हैसिंग सोसायटीत विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवर व्यक्तीचा सत्कार तसेच प्रतिमापुजन व अन्य विधी कार्यक्रम तसेच सायंकाळी ६ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे व जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंझार पाटील यांच्या हस्ते भव्य मिरवणूकीला सुरवात सांयकाळी भोजन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अंकुश मदने , उदय मोटकट्टे , अशोक मदने , सुरेश मोटकट्टे , अदिनी दिली
