सांगली : शिंदे गटाच्या माजी नगरसेवीका शितल म्हात्रे हिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो एडिट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती बसलेला दाखवून व्हायरल केला असल्याने त्याच्यावरती 504,505,268 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या वतिने आष्टा पोलिस ठाण्यात देण्यात आले , यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमीता जाधव , राजरामबापू दुध संघाच्या संचालिका उज्वला पाटील, तेजश्री बोंडे, शबाना मुल्ला , विदुला कावरे, सुजाता विरभक्त, सुवर्णा नाईक, कांचन माळी, नंदा कुशिरे , रेश्मा नायकवडी, निता काळोखे आदी महिला उपस्थित होत्या