गोंदीया : तालुक्यात मुले पळवून चोरी करणाऱ्या टोळींच्या अफवांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. या अफवांमुळे काही जणांना मारहाण ही झाली आहे. कुणालाही मारहाण करू नये असे आवाहन सतत पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. नुकतेच राज्याच्या सांगली जिल्ह्यात मुले पळविणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील लवंगा या ठिकाणाहून आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी मारहाण केली होती. त्यामुळे कोनत्याही अफवानां बळी पडुनये व सोसल मिडीयावर कोनतेही खोटे पोस्ट व विडीयो वायरल करुनये अन्यथा कायदेशीर कारवाई करन्यात येनार असल्याचेही देवरी पोलिसां तर्फे सांगन्यात आले आहे.
रेवचंद सिंगनजुडे पोलीस ठाने देवरी, यानीं अशा घटनांच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. अशा अफवा सध्या देवरीमध्ये अनेकांच्या व्हॉट्स अॅपवर येत आहेत. या अफवा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून देखील व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे नागरिकांनी काही जणांना मारहाण केल्याचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 2 युवकांना रस्त्यावर काहीजण मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर एका मनोरुग्णास चोर समजून मारहाण करण्यात आली असल्याचेही विडीयो वायरल होत आहे. दिवसेंदिवस या अफवा वाढतच आहेत. मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवांमुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातही दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक गावखेड्यात ग्रामस्थ रात्र जागून पहारा देत आहेत. मात्र, मुले पळविणाऱ्या टोळीच्या निव्वळ अफवा आहेत. या अफवांवर विश्वास ठेऊ नका. काही संशय आल्यास टोल फ्री क्रमांक 112 वर संपर्क साधा. पोलीस काही मिनिटात आपल्या पर्यंत पोहोचतील. पण कायदा हातात घेऊ नका असे आवाहन देवरी पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांमुळे भिक्षा मागणारे, बहुरूपीये, साधू यांना विनाकारण मारहाण होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी संशय आल्यास मारहाण करून कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधण्याचे तसेच कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास सर्वप्रथम पोलिसांना कळवा असे आवाहन देवरी पोलिस स्टेसनचे पोलिस निरीक्षक रेवंचंद सिंगनजुडे यानीं केले आहे.