प्रत्यक्ष कारवाई करण्यास अज्ञात कारणास्तव टाळाटाळ.!
दि 5 सप्टेंबर रोजी एन टी व्ही वृत्तवाहिनीने ”महसूल विभागात वाळू माफियांची दहशत” या शीर्षकाखाली तालुक्यातील वाळू माफियावर सविस्तर बातमी प्रकाशित केली होती,यामध्ये उमरगा शहरातील मुख्य पुलापासून ते दत्त मंदिरापर्यंत तब्बल 8 बांधकाम साहित्य विक्री दुकानासमोर वाळुंचे ढिगारे बाबत व शासनचा हक्काचा महसूल बुडवुन दररोज होणारी चोरटी वाळू वाहतूक ( कर्नाटकतील शहापूरची लाल रंगाची वाळू व अफजलपूरची काळ्या रंगाची वाळू)यावर सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.या बातमीची दहशत संबंधित वाळू माफिया मध्ये पसरली व सदर बातमी प्रकाशित होताच सर्व वाळू विक्रेत्यांनी आपापल्या दुकानासमोरील वाळूचे ढिगारे हलविले.यांनातर झोपेचे सोंग घेतलेल्या उमरगा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाग आली व यावर आळा अनन्याहेतु पथक तयार केले.तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांना त्या त्या मंडळातील अनधिकृतरित्या गौणखनिज उत्खनण व महसूल बुडवून चोरट्या मार्गाने होनारी वाळू वाहतूक आणि दुकानासमोरील वाळू साठे यावर पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंडळअधिकाऱ्यांना नायब तहसीलदार श्री कदम यांनी काढले. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी कोणीही अधिकारी वा कर्मचारी पुढाकार घेत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.अद्याप एकही गाडीवर तथा वाळुंचे ढीगरे मांडून थाटात अनधिकृत चोरट्या मार्गाने आणलेली वाळू विक्रेत्यांवर कार्यवाही झालेली नाही. कारवाई करायची नसेल तर पत्र काढलेच तरी का ..? तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई होणार का..? मंडळ अधिकारी,तलाठी आणि कोतवाल या सर्वांचा या पथकात समावेश असताना, प्रत्यक्षात कारवाई न करण्याचे नेमके “छुपे” कारण तरी काय आहेत .?असे प्रश्न सर्वासामान्य जनतेतून विचारले जात आहेत. दरम्यान आणखीन एक बडा मासा एल.सी.बी च्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे. चिरीमीरी घेऊन,महिनाकाठी प्रत्येक गाडीमागे विशिष्ट रक्कम घेत,शासनाचा महसूल बुडवुन अनधिकृत गौणखनिज विक्री करण्याची परवानगी देणारे कोण अधिकारी किंवा कर्मचारी आहेत..? हे आता येणारा काळ सर्वासमोर आणेलच हेही तितकेच खरे.
जसे,मटका जुगार अड्डे बंद झाले,केमिकलयुक्त शिंदी-ताडी विक्री केंद्र बंद झाले तसे चोरट्या मार्गाने होनारी वाळू वाहतूक बंद होणार का..?महसूल प्रशासन ऍक्टिव्ह मोड वर येणार का..?असा सवाल सुजान नागरिकांतून विचारला जातोय.
–//–//–
“चोरटी वाळू वाहतूक बंद करा, सर्वासामान्य नागरिकांच्या प्रलंबित विषये तत्परतेने सोडवा, वयोवृद्ध,अपंग, निराधारांचे पगारीबाबत चे प्रलंबित विषय मार्गी लावा अन्यथा शासनाची पगार असतानाही,अनधीकृतरित्या गौणखणीज उपसा व चोरट्या रीतीने वाळूतुकीला चिरीमिरी घेत परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यां विरोधात व तहसील कार्यालयाच्या भोंगळ्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल”- दादासाहेब बिराजदार(मुरूमकर)-सचिव,योद्धा फाउंडेशन उमरगा तालुका