कोव्हीड काळात स्पीकर पॅटर्न राबावीणारे एकमेव शिक्षक म्हणून राज्यभरात ख्याती
सचिन बिद्री:उमरगा
गेल्या २५ वर्षापासून उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे,हुशार,अभ्यासु,जिज्ञासु,वैज्ञानीक दृष्टिकोण बाळगणारे,मितभाषी शिक्षक श्री प्रवीण स्वामी यांचा ४५ वा वाढदिवस शाळेतिल विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला.यामध्ये शाळेच्या परिसरात लागवड केलेली झाडे विद्यार्थांनी दत्तक घेतले.यानंतर ‘शिक्षक’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

मुळात कोणालाही काहीच कल्पना न देता विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविल्याने शिक्षकवर्ग ही आश्चर्यात पडले व अगदी अभिमानास्पद उपक्रम राबविल्याने शिक्षक वृंदामध्ये गर्व ही निर्माण झाले.
पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त सामाजिक,व्यावहारिक ज्ञानाची भर टाकत आपल्या विद्यार्थ्यांवर संस्काराचे बीजारोपण करणारे शिक्षक श्री प्रवीण स्वामी आपल्या शिक्षकी पेशात उत्तम ठरत आहेत हे केवळ त्यांच्या उत्तम शिकवणी मुळे. त्यामुलेच तर आजही जि प शाळांची पत व पट अबाधित राहत आहे असे म्हणावे लागेल.या प्रसंगी माजी सरपंच संजय पाटील,माजी अध्यक्ष मनोहर मामा,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वजीत खटके,सुनील पाटील यांच्यासह उमरगा शहरात राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.
शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने विद्यार्थी निमित्त शोधत असतात त्यात जर विद्यार्थ्यांना आपल्या गुरुंचा जन्मदिन साजरा करण्याचा क्षण उपलब्ध झाला तर सोने पे सुहागाच म्हणावा लागेल.
विद्यार्थ्यांची जडणघडण करत श्री स्वामी यांची सेवेची 25 वर्षे पूर्ण झाले असून तालुक्यातील तुरोरी, मुळज, चिंचोली, मळगिवाडी आदी गावातील जि प शाळेत एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावले दरम्यान तुरोरी जि प केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना श्री नंदकुमार मुक्कावार यांच्याकडून जवळपास चाळीस(40)लाख रुपये किंमत असलेली वीस गुंठे जमीन शाळेसाठी दानपत्राच्या माध्यमातून घेतली. ज्या शाळेत ते जातात तेथे नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत, हसत खेळत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी नर्माण करण्यात श्री स्वामी यांचा हातखंडा असल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या काळात जिथे शाळा बंद होत्या, ऑनलाईन शिक्षण हाच पर्याय होता पण गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अभ्यास कारण्यासाठी मोबाईल नसल्याने व संबंधित गांवात आवश्यक नेटवर्क नसल्याने ऑनलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून शिक्षणाचा लाऊड स्पीकर पॅटर्न राबविला.ज्यामुळे विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करायचे तर शिक्षक हे मंदिरातून शिकवायचे, गावातील हनुमान मंदिर,शाळा,समाज मंदिर येथे बसाविण्यात आलेल्या स्पीकर मुळे शिक्षकांची शिकवणी विद्यार्थ्यांना सहज श्रवण होत होते. या अनोख्या पॅटर्न चा राज्यभरात कौतुकही झाले होते