गडचिरोली : ऐटापल्ली तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बुर्गी व मरकल येथे एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रम राबविण्यात आला. या वेळीं शेतकऱ्याची सभा घेऊन विविध योजनांची माहिती देण्यात आली.या प्रसंगीं कार्यक्रमाचे प्रमूख
मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती चे कृषी अधिकारी कु सुषमा रामटेके ,कृषी विस्तार अधिकारी श्री तुषार पवार ,बायफ चे श्री डोरलीकर उपस्तीत होते. राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषद विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.या वेळी कृषी अधिकारी कु सुषमा रामटेके यांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने विषयी सखोल मार्गदर्शन केलें. व ऑनलाइन अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच श्री तुषार पवार कृषी विस्तार अधिकारी यांनी 50 टक्के अनुदानावर किटक नाशकाचे वितरण,प्रधान मंत्री किसान सन्मान योजना,स्व गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात योजना,रासायनिक खतांचा वापर, किटक नाशकाचे वापर,नॅनो युरियाचा फायदा,कृषी यांत्रिकीकरण योजना ई बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.हा उपक्रम पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री मुकेश मोहोर ,कृषी विकास अधिकारी श्री प्रदीप तुमसरे,सहा.गट विकास अधिकारी श्री श्रीकृष्ण पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.कार्यक्रम यशस्वी साठी श्री निलेश दुर्ग, गोविंदा दुर्गे व ग्रामस्थांनी अथक परिश्रम केले.