खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमीचा पुढाकार
खापरखेडा-प्रतिनिधी
रातोरात अफलातून मार्गदर्शनामूळे प्रसिद्ध झालेल्या वर्ध्याचे प्राध्यापक नितेश कराळे मास्तरची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा खापरखेडा येथे २ ऑक्टोबर रविवारला भरणार असून यासाठी खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमी कोराडी यांनी पुढाकार घेतला आहे त्यामूळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्राध्यापक नितेश कराळे यांना ओळखीची गरज नाही ते सोप्या व सरळ भाषेत मार्गदर्शन करीत असल्यामूळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक गळ्यातील ताईत बनले आहे ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात होतकरू विद्यार्थी आहेत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामूळे ते स्पर्धेच्या युगात मागे पडले असल्याचे दिसून येत आहे त्यामूळे सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन नागपूर जिल्हा मराठी पत्रकार सलग्न खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमी कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहत मनोरंजन गृह क्रमांक दोन येथे प्राध्यापक नितेश कराळे यांच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन २ ऑक्टोबर रविवारला सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे उदघाटन खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या हस्ते करण्यात येणार असून नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुम्मडवार हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी उपमुख्य अभियंता जितेंद्र टेंभरे, डॉ अनिल कोठोये, कल्याण अधिकारी अमरजित गोडबोले, वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे, सावनेर पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, जि.प.सदस्य प्रकाश खापरे, निलिमा उईके, पं.स.सदस्य राहुल तिवारी, प्रफुल करनाईके, पुष्पा करडमारे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून सरपंच रविंद्र चिखले, पुरुषोत्तम चांदेकर, पवन धुर्वे, प्रमिला बागडे, उज्वला लांडे, प्रकाश गजभिये, कांताबाई कानफाडे, प्राचार्य रामकृष्ण टाले, मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड, अहमद शेख, मुख्याध्यापिका अनुजा ऐपतवार, राधा मोहरील, चारूलता बिजवे यांच्यासह परिसरातील सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.उपरोक्त स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमी कोराडीच्या वतीने करण्यात आले आहे.