भानेगाव पारशिवणी टी पाइंट परिसरात जय्यत तयारी,हजारो नागरिकांची गर्दी उसळणार
आपल्या वाणीने अनेकांना भुरळ घालणारे विदर्भातील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार व सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनाचा कार्यक्रम भानेगाव पारशिवणी टी पाइंट परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून १६ ऑक्टोबर रविवारला सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला असून यावेळी हजारो नागरिकांची गर्दी उसळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आकोट तालुक्यातील सत्यपाल महाराज तुकडोजी महाराजांच्या जिवन कार्याला प्रभावित होऊन मागील ४० वर्षांपासून अंधश्रद्धा, बुवावाजी, व्यसनमुक्ती, समाजातील वाईट प्रथा, युवक युवतींना मार्गदर्शन, महापुरुषाचे जिवन कार्य, राजकारण आदि अनेक विषयांवर समाजप्रबोधन करीत आहेत. सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन विनोदी व अस्सल वराडी भाषेत असल्यामूळे अनेकांना भुरळ घालत आहे.संपूर्ण देशविदेशात सत्यपाल महाराज यांच्या हजारो समाज प्रबोधनाचे कार्यक्रम पार पडले असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे १६ ऑक्टोबरला भानेगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने सप्तखंजिरी वादक व समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम पारशिवणी टी पाइंट परिसरात सायंकाळी ७ वाजता आयोजित केला आहे.उपरोक्त कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्यामराव सरोदे, अनेस चौरे, राज तांडेकर, अमोल कळंबे, कृष्णा चिकनकर, अभय घुगल, विपीन नाईक, बालू पाठराबे, प्रणय कुंभारे, सुभाष चांदसरोदे, ईश्वर चिकनकर, विजय गौरकर, पंकज चुकांबे, अरविंद तांडेकर, कृष्णा बर्वे, जितेश देशभरतार, सचिन नागरकर, सुमेध चौहान, मुकेश बागडे, मयूर गभने, सोनू बागड़े, नरेश कनोजे, नीलेश घोरमारे, विकास बारई, मुकेश चौरे, अभी मनघटे, पंकज मडावी, गुणवंत टापरे, मोनीष कुंभलकर, बबन सोनेकर, विक्की मालाधरे, राहुल जाटव, रुपेश पांडे, चेतन भोंडेकर, मिलिंद कुंभलकर, आदिनी केले आहे.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा