नागपूर : शिक्षण क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्याऱ्या खापरखेडा परिसरातील दोन प्रतिभावंत विद्यार्थीनी करिना किशोर बक्सरिया व वृषाली रोशन गोस्वामी ह्या विद्यार्थीनीचा क्रिडा व शिक्षण क्षेत्रात नेहमी अग्रसर राहणाऱ्या व्हि.जी.ए.अकॅडेमी खापरखेडा च्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वार्ड क्रमांक ३ रेल्वे चौकी खापरखेडा येथे राहणाऱ्या करिना किशोर बक्सरिया या विद्यार्थीनीने एम.ए.इंग्लिश लिट्रेचर अभ्यासक्रमात ६८% प्लस गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला फार कमी विद्यार्थी एम. ए.इंग्लिश लिट्रेचर अभ्यासक्रमात ६८% प्लस गुणां पर्यंत मजल मारतात तर नविन बिना भानेगाव येथे राहणाऱ्या वृषाली रोशन गोस्वामी ह्या विद्यार्थीनीने १२ व्या विज्ञान शाखेत ८५% गुण मिळवीत लोकसेवा आयोग अभ्यास क्रमाची तयारी करीत आहे ह्या दोन्ही विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत हे विशेष!
खापरखेडा परिसरातील विद्यार्थीनी शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे त्यामूळे धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून व्हि.जी.ए.अकॅडेमी खापरखेडा तर्फे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी करिना व वृषालीच्या आई वडिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्हि.जी.ए.अकॅडेमीचे अध्यक्ष राजेश यादव, सचिव विशाल वांढरे, कोषाध्यक्ष लकी सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी राजेश यादव यांनी विद्यार्थ्यां सोबतच कुटंबाची जबाबदारी योग्यरित्या पार पडणाऱ्या आई वडिलांच्या प्रोत्साहन व योग्य समुपदेशना मूळेच करिना व वृषालीला यश गाठता आल्याचं सांगितलं.
यावेळी चिचोली ग्राम पंचायत सदस्य अशोक मेश्राम, संदीप सोमकुवर, धीरज देशभ्रतार, पत्रकार सुनील जालंदर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील, दिलीप रामटेके, किशोर बक्सरिया, रोशन गोस्वामी, उदय मोरे, राजू ठाकरे, संपत खंडाते, सुनील गौरखेडे आदि आवर्जून उपस्थित होते.
विनोद गोडबोले