बॅरी. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ ए पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.जी. टाले अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन प्राध्यापिका डॉ. संगीता चोरे यांनी केले याप्रसंगी बोलताना त्यांनी वाचन प्रेरणा दीन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके वाचणे किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ आर.जी.टाले यांनी अब्दुल कलमांच्या जीवन चरित्रवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यानं बद्दल असलेली त्यांची तळमळ तसेच वाचनाने आपली निर्णय घेण्याची क्षमता कशी वाढते, चागल्या वाईट गोष्टीचे ज्ञान आत्मसात करण्यास मदत होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आयष्यातील काही वेळ नक्कीच वाचाण्याकरता घालवावा व कलमांच्या स्वप्नातील भारत नक्कीच तयार झालेला दिसेल असे वक्तव्य केले.
यावेळी प्रमुख वक्त्या प्राध्यापिका डॉ अंजली पांडे यांनी कलमांची देशाप्रती असलेली प्रतिष्ठा व निष्ठा यावर प्रकाश टाकून वाचाल तरच वाचाल हे कलमांना कसे अपेक्षित होते ते समजावून सांगितले.
याप्रसंगी कु.साक्षी जुंघरे, प्राची खुरगे, राखी काळसरपे, हर्षदा महल्ले या विद्यार्थिनींनी आपली मते व्यक्त केली तसेच पुस्तकातील वाचन करून त्याचा अर्थ समजावून सांगितला कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका डॉ. संगीता उमाळे यांनी केले तर आभार प्राध्यापिका डॉ. प्रतिभा गडवे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.सोमकुवर; डॉ. जनबंधू; शिल्पा घाटोले; प्रा.फाये; प्रा. तांडेकर; गणेश ढोके यांनी सहकार्य केले. प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा