नांदेड : नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी शहरातील वामन नगरच्या बाजूला असलेल्या शेतात जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना समजताच त्यांनी तातडीने दि. ३ आक्टोबरच्या रात्री १.३० वाजताएक पथक पाठवून धाड मारली. यात १लाख ७१ हजार रोख, ६ मोबाईल व ७ मोटारसायकल असा ५ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून. ८ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक महिण्यापासून छुप्या पध्दतीने जुगार अड्डा चालवण्यात येत होता पण जुगारी दररोज जागा बदलत असल्याने पोलिसांना कारवाई करण्यात यश येथे त नव्हते पण दि. ३ आक्टोबर रोजी शहरातील वामन नगर च्या बाजूला असलेल्या शेतात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळाली. सदरची माहिती मिळताच रामतीर्थ व नायगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना एकत्रित करुन पथक पाठवण्यात आले. या पथकाने एकही जुगारी सूटू नये यासाठी दोन बाजून सापळा लावून बराच अंतर पायी चिखलात चालत जावून रात्री १.३० वाजता धाड मारली. यावेळी तीन पत्ता खेळताना जुगारी दिसून आले. शेख जावेद सरदार रा. विठल नगर नायगांव, शिवाजी नागोराव जाधव रा. कुष्णूर, बालाजी तुळशिराम गुडमतवार रा मुखेड, शिवाजी बाबाराव पाटील रा. मुखेड, पिराजी बालाजी काळमीरे रा. सालेगांव ता. नायगांव, सोमनाथ रावसाहेब बैलके रा. नायगांव, हनमंत गोविद नायगांव व राजेश शिवाजी सुकने रा. जुने नायगांव अदि आठ जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून रोख रक्कम १ लाख ७१ हजार रूपये व जुगाराचे साहीत्य, ६ मोबाईल ७ मोटार सायकली असा एकूण ५ लाख २४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई दरम्यान काही जुगाऱ्यांनी धुम ठोकली पण त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे, पो.उप.नि. बाचावार, पोलिस उप निरिक्षक वाघमारे, पोहेका मुस्तापूरे, पोहेकॉ देगलूरकर, पोहेकॉ वळगे पोहेकॉ गंदपवाड, तमसुरे, पो. कॉ. देवकते, पो. कॉ क्षिरसागर, चालक पो.उप.नि. झेलेवाड, अंगरक्षक पो.ना आचेवाड अदिनी परिश्रम घेतले. अनेक दिवसानंतर जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याने शहरात खळबळ तर उडाली आहेच पण जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
