(सचिन बिद्री:उमरगा)
उस्मानाबाद : प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने उमरगा शहरात दि.०५ ऑक्टोबर (बुधवार) रोजी विवेकयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अज्ञानाच्या अंधकाराचे सिमोल्लंघन,वाचन संस्कृतीचा जागर अन् विचारांचं सोनं लुटणारी ही यात्रा हुतात्मा स्मारक ते काळा मारुती मंदिर या मार्गावर सकाळी ९ ते दुपारी १२ च्या दरम्यान निघणार आहे.
या विवेकयात्रेत विद्यार्थी, महिला व पुरुष हातात पुस्तके, लेखण्या व महामानवांच्या विचारांचे फलक घेवून मार्गक्रमण करतील. तसेच विवेकयात्रेत समाजातील सांस्कृतिक वैविध्याचे प्रदर्शन करणारे अनेक कला-गुण सादर केले जाणार आहेत.विवेकाचा जागर करणाऱ्या या यात्रेत सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन वाचनालयाचे पदाधिकारी शांताबाई शामराव चव्हाण,सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, राजू बटगिरे, करीम शेख, ॲड. ख्वाजा शेख, धानय्या स्वामी, दादा माने, प्रदिप चौधरी, अनुराधा पाटील, संतोष चव्हाण, विजय चितली, बबिता मदने, सिद्राम जमादार, किशोर औरादे व ॲड. शीतल चव्हाण यांनी केले आहे.