उमरगा व बलसुर येथे झाले रावण दहन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सबंध महाराष्ट्रभर,महाराष्ट्र द्रोही रावणाचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बलसुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर उमरगा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते दि .५ रोजी रावण दहन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी न देणाऱ्या,महागाई करून सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या,काळ्या पैशास उत्तेजन देणाऱ्या,वेदांतासारखे महाराष्ट्राचे हक्काचे प्रकल्प गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या,बेरोजगारी निर्माण करणाऱ्या,महिला सुरक्षेबाबत असंवेदनशील असणाऱ्या,स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या,इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडणाऱ्या शेतक-यांच्या महत्वाच्या विषयांबाबत असंवेदनशील असणा-या आणि भ्रष्टाचारास चालना देणा-या महाराष्ट्रविरोधी रावणाचे दहन महाराष्ट्रभर विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून बलसुर व उमरगा येथे या महाराष्ट्रद्रोही प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्यात आले.

यावेळी बलसुर येथे रावण दहन प्रसंगी प्रा बिराजदार,रमेश बिराजदार ,माधव नांगरे,प्रदीप पाटील, दिगंबर औरादे ,पवन पाटील, सुरेश जोशी, विक्रम तुरुरे, प्रशांत शित्रे ,आबा वाकडे, भगवान थोरात, संदीप देवनाळे, आयुब पटेल ,वसंत साखरे ,मनोहर पाटील, माधव कांबळे, व्यंकट दळवे, विक्रम पाटील , आदींची प्रमुख उपस्थिती होती तर उमरगा येथे तालुका सरचिटणीस धीरज बेळंबकर,युवक तालुका अध्यक्ष शमशोद्दीन जमादार,तालुका कार्याध्यक्ष शंतनू भैया सगर,शहराध्यक्ष खाजा मुजावर,युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, सरपंच रणजीत गायकवाड,शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण,सागर सोनवणे, मंगेश गायकवाड,आंनंद पाटील , गोपाळ घोडके,संकेत नागने,पप्पू माने,रोहीत शिंदे,यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
सचिन बिद्री:उमरगा