हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील सहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लिहिले पत्र यावर्षी सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे यावर्षीच्या दसऱ्यामध्ये आम्ही पुरणाच्या पोळ्या खाल्ल्याच नाही किमान दिपवाळीला तरी पुरणाच्या पोळ्या खाऊ द्या असे पत्र लिहिले

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी असलेले प्रताप जगन कावरखे इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला प्रताप कावरखे यांनी आपल्या वडिलाकडे हट्ट केला होता पण वडील अतिवृष्टी झाल्याने मुलाचा हट्ट पूर्ण करू शकले नाही म्हणून मुलाने थेट मुख्यमंत्री साहेब यांना पत्र लिहून पाठवले आहे आणि या पत्राची चर्चा सर्वत्र होत आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवा शेतकऱ्याची मुले येत्या दिपवाळीला पुरणाच्या पोळ्या खातील असे पत्र जगन कावरखे इयत्ता सहावीतल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहून पाठवले आहे तरी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा असे देखील या पत्रामध्ये लिहिले आहे,,

प्रतिनिधी महादेव हरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *