हिंगोली : स्व. आर आर पाटील सुंदर स्मार्ट ग्रामपुरस्कार योजना स्पर्धेसाठी अनेक ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असुन स्व.आर आर पाटील सुंदर स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी अर्ज प्रस्ताव सादर केले असून त्या अनुषंगाने दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी व त्यांच्या पथकाने ताकतोडा गावाला भेट देवून गावातील विविध विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी

तसेच जिल्हा परिषद शाळेची पाहणी करून दर्जेदार शाळेचे काम करण्याच्या सूचना दैने यांनी दिल्या त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन करतांना मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी सांगितले की गावाचा विकास हा गावकऱ्यांच्या हातात असतो सर्व गटबाजी बाजुला ठेवुन गाव विकासासाठी एकजुटीने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाचा विकास करण्याचे ठरवले तर नक्कीच गाव सुंदर स्मार्ट होऊन गांवचा विकास होईल हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव, रेणापूर गावासारखे गावं विकासाला चालना देत आहेत व त्या गावांमध्ये आज ही बिनविरोध निवडणूक होतात या बिनविरोध निवडणुकांमध्ये गावाला चांगलाच फायदा होईल.सोबतच गटबाजी, भांडण तंटे उद्भवणार नाही यासाठी नागरिकांनी गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावं अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे, जिल्हा कृषी विकास अधिकारी कानवडे,डॉ.जाधव,बांगर , सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी कोकाटे, एच् आर डी पी चे डि के मनवर , सचिन चटुले, सुनील चपळगावकर ,धमानंद भगत, मिलिंद बागडे , तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी या मान्यवरांचं ताकतोडा ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक मेनकुदळे यांनी प्रास्ताविकामधून ताकतोडा गावाचा लेखाजोखा मांडला व गावात केलेल्या विकास कामाचा अहवाल वरिष्ठांना वाचून दाखवला आणि ताकतोडा गावाच्या विकासासाठी ताकतोडा गावातील नागरिकांनी गावाचा विकास करण्यासाठी आम्हाला साथ देऊन गावाचा विकास करून घ्यावा ग्रामसेवक मेनकुदळे यांनी सांगितले. तर ताकतोडा गाव स्व.आर आर पाटील सुंदर स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी मी सदैव विवीध योजनेतून गाव विकासासाठी योग्य नियोजन करून गावं विकासाकडे वाटचाल करेन यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत गांवचा विकास करणार असे मत सरपंच प्रमोद सावके यांनी व्याक्त केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *