आजेगाव,गोरेगाव ,पुसेगाव ,बाभुळगाव , चार महसूल मंडळातील शेतकर्याना अतिवृष्टी समाविष्ट करून मदत द्या,राज्यपाल यांना निवेदन देत केली मागणी

 हिंगोली : जून ते ऑगस्ट या कालावधीत सतत सुरू असलेल्या पाऊसामुळे संपूर्ण सेनगाव  तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असुन शासनाकडून याचे पंचनामे करून मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकर्याना होती नुकसान भरपाई तर सोडा महसूल तसेच कृषीआधीकारी शेतकर्याच्या बांधांवर फिरकले नसुन एकीकडे  शासना कडुन  नुकसान भरपाई अनुदान मंजूर सुद्धा करण्यात आले परंतु दुसरीकडे सेनगाव तालुक्यातील चार महसूल मंडळातील 58 गावांना अतिवृष्टीतुन जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे.संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ असतांना सेनगाव तालुक्यातील चार मंडळातील  58 गावातील शेतकऱ्याना अतिवृष्टीतुन वगळल्याने शेतकर्यावर शासनाकडून अन्याय केला असल्याने शेतकर्यासमोर खाजगी तसेच शावकाराकडुन घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरी लोकप्रतिनिधी शेतकर्या कडे लक्ष देत नसल्याने शेतकर्यामध्ये असंतोष पसरला असल्याने परमेश्वर ईगोले पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य यानी  राज्यपाल याची भेट घेऊन निवेदन देत आजेगाव बाभुगाव, पुसेगाव, गोरेगाव, या चार महसूल मंडळातील 58 गावाचा अतीवृष्टीत समाविष्ट करून सर्व शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *