हिगोली : जिल्ह्यात यावर्षी पाऊसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे शेतकर्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्याच्या पिकाची नासाडी झाली प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव,आजेगाव,बाभुळगाव आणि पुसेगाव हीचार मंडळे अतिवृष्टीतुन वगळण्यात आली असल्यामुळे शतकरी वर्गात तिव्र संताप व्यक्त केला जात असुन पळशी येथील युवा शेतकरी पंडीत पांडुरंग खिल्लारे या शेतकर्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन अतिवृष्टीमुळे सगळे पिकाचे नुकसान झाले आहे बँकेच कर्ज कसं फेडाव आणि कुटुंब कस जगवायचं यामुळे निराश झालेल्या खिल्लारे या शेतकर्याने थेट शासनाने राजकिय द्वेषांमुळे काही मंडळे अतिवृष्टीतुन वगळली असल्याचा आरोप शेतकर्याने केला असुन मला व सर्व कुटुंबाला ईच्छा मरनाची परवानगी मागीतल्याने हिंगोली जिल्ह्याभरात एकाच खळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्याभरात ओला दुष्काळ असतांना काही गावं अतिवृष्टीतुन वगळण्यात आली असुन शेतकरी विविध ठिकाणी आदोलन करत आहे तर दुसरीकडे आपन निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी शेतकर्याच्या मागण्या कडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे पळशी येथील शेतकर्याने पत्र लिहुन ईच्छा मरनाची परवानगी मागीतल्याने मुख्यमंत्री या कडे लक्ष देणार का अशी जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे