
हिंगोली : जिल्ह्याभरात यावर्षी पाऊसाळ्याच्या सुरवातीपासुनच कुठे अतिवृष्टी तर कुठे मुसळधार पाऊसामुळे पिकाची नासाडी झाली आहे संपूर्ण पिक पाण्याखाली गेली होती सतत सुरू असलेल्या पाऊसामुळे पिकाची फवारणी तषेच खुरपणी झाली नसल्याने पिकावर विविध प्रकारचे रोग पडत आहे तर तण पिकाच्यावर गेल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे हिगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ असुन अतिवृष्टी झाली तरी यातुन काही गाव अतिवृष्टी तुन वगळण्यात आली असल्याने शासनाकडून शेतकर्याची थट्टा केली जात आहे सेनगाव तालुक्यातील गोरेगाव,बाभुळगाव,आजेगाव आणि पुसेगाव ही चार सर्कल अतिवृष्टी तुन वगळण्यात आली असल्याने शेतकरी वर्ग दि.सप्टेंबर पासून संपावर जाणार असल्याचे निवेदन आज शेतकर्यानी गोरेगाव येथील तलाठी यांना दिले असुन निवेदनात म्हटले आहे की जो पर्यंत हिगोली जिल्ह्यातील सरसकट शेतकर्याना मदत मिळत नाही अशा विविधमागणीसाठी सर्व शेतकरी संपावर जाणार आहे हे आदोलन गोरेगाव येथील अप्पर तहसिल कार्यालयासमोर सुरू राहणार असल्याचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी सांगितले आहे.