उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता निवडणूक आयोगानं ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे. याआधी शिंदेंच्या गटानं चिन्हांसाठी दिलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने नाकारला होता. त्यामुळे त्यांनी नवे प्रस्ताव दिले होते. आज 11 ऑक्टोबर रोजी बाळासाहेबांची शिवसेना गटाने काही पर्याय सादर केले होते. हे पर्याय ई-मेलद्वारे सादर करण्यात आले होते. तुतारी, शंख, रिक्षा, पिंपळ, ढाल-तलवार, तळपता सूर्य हे पर्याय बाळासाहेबांची शिवसेना गटाने मागितले होते. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह आता शिंदेंच्या गटाला म्हणजेच ‘बाळासाहेबांची शिवसेने’ला देण्यात आलं आहे.